Thursday 29 June 2017

नावात सगळं आलं

http://www.economist.com/news/briefing/21723815-tax-reform-does-not-go-far-enough-land-and-labour-reforms-have-barely-been-tried-narendra-modi

Economist वृत्तपत्राने अलिकडे भारतात येऊ घातलेल्या GST करप्रणालीवर (माझ्या मते संतुलित) टीका केली. यावर माझ्या मित्रवर्तुळातून अशी टीका आली की "ह्या स्तंभाच्या लेखकाचे नाव वृत्तपत्राने प्रसिध्द केले नाही त्यामुळे लेखास credibility नाही."

तेव्हा मी म्हणालो की 2013 साली Economistने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे:
http://www.economist.com/blogs/economist-explains/2013/09/economist-explains-itself-1

"Why are The Economist’s writers anonymous?
Because it allows many writers to speak with a collective voice
LEADERS are discussed and debated each week in meetings that are open to all members of the editorial staff."

परंतु मंडळींचे समाधान झाले नाही.

आता पाहा...काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे यावर आपण चर्चा करत आहोत. हे आम्हा भारतीयांचे वैशिष्ठ्य आहे.

Economist मध्ये जे लिहून आले आहे त्यावर मतभेद असू शकतात परंतु मूळ हेतूबद्दल आपण साशंक असावे असे काही मला स्तंभात दिसले नाही.

GSTचे उदाहरण घेऊ. चला, सरकारी तज्ञ म्हणतात GSTने करोत्पन्नात वृध्दी होईल, आम्ही म्हणतो बरं आणा GST. परंतु प्रश्न असा पडतो की करोत्पन्न वाढवायच्या guaranteed व ज्यांनी जनतेला बिल्कुल तोशिष पडणार नाही अशा साधनांचा आधी अवलंब का केला जात नाही? उदाहरणार्थ Hindu Undivided Family नावाची tax entity. बरखास्त करा. त्याचा वापर करून करोडो रुपये कर बुडवला जातो. पण ते करायचे नाही. हितसंबंध आहेत.  GST, demonetization यासाखी धेंडं नाचवायची. ज्यांचा चांगला वाईट असर अनेक वर्षांनी जाणवेल.

"FEW countries would see a tax requiring some businesses to file over 1,000 returns a year as an improvement. But India might. A nationwide Goods and Services Tax (GST) is set to come into force on July 1st.

The GST, although welcome, is unnecessarily complicated and bureaucratic, greatly reducing its efficiency."

यात आक्षेपार्ह काय आहे? मग ते नोबेल विजेत्याने लिहिलं काय किंवा एखाद्या सोम्यागोम्याने लिहिलं काय.

तथ्य असलेलं पण आपल्याला खुपणारं लिखाण आढळल्यावर थेट लेखकाच्या किंवा प्रकाशनाच्या हेतूबद्दल शंका प्रकट करण्याच्या आपल्या (including me) प्रतिक्षिप्त क्रियेस आळा घातला पाहिजे. हा स्वभाव भारतीयांच्यात इतका भिनलेला आहे की जागतिक पातळीवर गेल्यावर सुरुवातीला बहुतेक भारतीय यामुळे गटांगळ्या खातात. काही नंतर भानावर येतात, बरेच तिथेच अडकून पडतात.

Anyways हा "Credibility by name" प्रकार विचित्र आहे.
नाना पाटेकर शेती संकाटाबद्दल काहीही बोलतो पण खपतं.
पण "मिलिंद मुरुगकर" ह्या नावाखाली आलेल्या मतांना लोक महत्त्व देत नाहीत.

No comments:

Post a Comment